थंडीच्या गारव्यामुळे गरमागरम चहाकडे ग्राहकांचा वाढला कल
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी:दिवाळी संपताच हवामानात बदल झाला आणि सगळीकडे गारगार गारठा सुटल्याने गावोगावी शेकोट्या पेटल्याचे दिसते.तर सकाळी व राञी च्या गारगार गारव्यापासून सुटका करवून घेण्यासाठी थंडीने गारठलेली मंडळी गरमागरम,वाफाळलेला चहा पिण्यासाठी टी स्टाॅल मध्ये जाऊन वाफाळलेल्या गरम चहाचा घोट फुर फूर करीत घेताना दिसतात.
गत पावसाळ्यात या भागात सर्वञ पावसाने धुमाकूळ घातला होता. म्हणुन येथील तिरु मध्यम प्रकल्प व छोट्या,मोठ्या नद्या,नाले,ओढे यांना २,२ वेळा महापूर आला होता.आणि याचाच परिणाम म्हणुन की काय दिवाळी संपताच सर्वञ शितलहर आली आणि पारा ८ पर्यंत घसरला. व या गारठ्याने गारठलेले ग्रामस्थं टी स्टाॅल मध्ये जाऊन वाफाळलेला चहा पिऊन थंडी पासून बचावाचा प्रयत्न करत आहेत.
मागच्या ८दिवसात हिमालयातून येणारे उत्तर-पश्चिमी वारे वाढल्याने हवेत गारठा(थंडी)वाढला होता.अण् याचा सर्वाधिक ञास नवजात शिशू व जेष्ठांना जाणवू लागला होता.तर या गारठ्यामुळे वाफेचे सौदागार असलेल्या टी स्टाॅलकडे ग्राहकांचे पायं वळू लागले.आणि गरमागरम व कडक चहा,बुस्ट पिऊ लागले.


0 Comments