महानगरपालिकेचे आयुक्त लाच घेताना रंगेहात अटक!*
१० लाखांच्या लाचेचा व्यवहार करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
शहरात खळबळ
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार हा एक स्थानिक कंत्राटदार असून त्याचे पालिकेचे बांधकाम बिल अडकले होते.
त्या बिलाच्या मंजुरीसाठी आयुक्त खांडेकर यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली*, *असा आरोप तक्रारदाराने केला होता.
त्यानंतर तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ए.सी.बी.) (A.C.B.) नोंदवली.
तक्रारीची सत्यता तपासून ए.सी.बी.(A.C.B.)ने सापळा रचला आणि दुपारी
जालना शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानी ही कारवाई केली.
सदर ठिकाणी आयुक्त संतोष खांडेकर* यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी
ए.सी.बी.(A.C.B.)च्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
कारवाईनंतर ए.सी.बी.(A.C.B.)च्या अधिकाऱ्यांनी *खांडेकर* यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती सुरू केली आहे.
त्यात काय दस्तऐवज, रोख रक्कम किंवा अन्य पुरावे सापडतात का ?
याकडे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ए.सी.बी.(A.C.B.)कडे या प्रकरणात पुरावे आणि व्यवहाराचे ठोस रेकॉर्डिंग असल्याचे समजते.
या प्रकरणात महानगरपालिकेचे आयुक्त
संतोष खांडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच घेतल्याचा व्हि.डि.ओ. आणि पुरावे ए.सी.बी.(A.C.B.)कडे जमा झाले असून पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडण्यात आल्याने जालना शहरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कडक कारवाई करून निलंबनाची मागणी केली आहे.


0 Comments