जनतेची सुरक्षा हिच पोलिसांची दिवाळी,
उप तालुका प्रमुख जगन्नाथ मनाळे यांनी दिल्या पोलिसांना शुभेच्छा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा:आमच्यासाठी पोलिस व्हॅनवरील लुकलुकणारा दिवा म्हणजे आकाश कंदील पोलिस व्हॅनचा सायरनचा आवाज म्हणजे फटाक्यांचा आवाज. संकटात सापडलेला आणि आम्ही वाचवलेला अत्यवस्थ हीच पोलिस बांधवांची दिवाळी. अशा भावना पोलिस बांधवा प्रति व्यक्त करत शनिवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी शिवसेना उबाटा गटाचे उप तालुका प्रमुख जगन्नाथ मनाळे यांनी कासार सिरसी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रविण राठोड व त्यांच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कोणताही सण, उत्सव असला तरी पोलिस कुटुंबापासून दूर असतात .कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. सध्या प्रत्येकजण जोरदार दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच 'जनतेची सुरक्षा हीच पोलीस बांधवांची दिवाळी' मानून पोलिस चोख कर्तव्य बजावत आहेत. जनता आनंदित तर पोलीस बांधवांची दिवाळी आनंदित जाईल, अशा भावना मनाळे यांनी पोलीस बांधवा प्रति व्यक्त केल्या.पोलिस ऑनड्युटी चोवीस तास काम करतात. कामाचे तास निश्चित नसल्याने ड्युटी संपल्यानंतर अचानक अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते. सण, उत्सवात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द होतात. अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारे पोलिस घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्यला प्राधान्य देतात. कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते. सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळला असून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवाळीची मजा लुटत आहेत. मात्र ही दिवाळी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस चोख कर्तव्य बजावत आहेत.



0 Comments