कासार सिरसी महाऑनलाइन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची लूट — प्रमाणपत्रासाठी ‘दरवाढ
स्थानिक प्रशासनाकडून चौकशीची मागणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : मौजे कासार सिरसी येथील महाऑनलाइन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांकडून शासकीय प्रमाणपत्रांसाठी जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, निवासी दाखला आदी अर्ज भरताना शासकीय नियमावलीस बगल देऊन प्रत्येकी 300 ते 500 रुपये आकारले जात आहेत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी तहसीलदार निलंगा यांच्याकडे केली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, प्रशासनाच्या नावावर आर्थिक लूट चालवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पालक व विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने अवाजवी शुल्क आकारून शासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा हा प्रकार असल्याने याची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


0 Comments