महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
उप संपादिका: अश्विनी बोने
छाया: अश्विनी बोने
निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महात्मा बसवेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण कासार सिरसी पोलीस चौकी येथील गृहरक्षक दल जगन्नाथ कामले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद मुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक एकमतचे पत्रकार द्रोणाचार्य कोळी होते. ध्वजारोहणासाठी परिसरातील विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर भाषणे केली. त्याचबरोबर देशभक्ती पर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्याध्यापक दिनकर तरमुडे व सर्व शिक्षकवृंद यांनी केले.तर सुत्रसंचालन मीनाक्षी तरमुडे यांनी केले. व आभार प्रदर्शन राजश्री दाळिंबे यांनी मानले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक दिनकर तरमुडे, उपमुख्याध्यापक मीनाक्षी तरमुडे,शिवकन्या क्षीरसागर, राजश्री दाळिंबे, वैष्णवी बेद्रे, शुभांगी दाळिंबे, प्रियंका मोहिते, सुवर्णा सुरवसे, कल्पना कांबळे, उध्दव इंगळे
आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.






0 Comments