सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण राठोड यांना विशेष सेवा पदक जाहीर
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलवादग्रस्त जिल्ह्यामध्ये हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल राज्यातील पोलीस अधिकारी व जवानांना या विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येते. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मोहनराव राठोड यांनीही नक्षलग्रस्त भागात सन २०१५ ते २०१७ या कालावधीत आपले कर्तव्य बजावत उत्कृष्ट व धाडसी कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.



0 Comments