Advertisement

हंडरगुळीत ध्वज वंदन संपन्न

 हंडरगुळीत ध्वज वंदन संपन्न



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


 हंडरगुळी : केंद्राने ठरवुन दिल्याप्रमाणे हर घर तिरंगा या अभियानाला हंडरगुळीत प्रारंभ झाला आहे.आणि याचाच एक भाग म्हणुन दि.१३ रोजी येथील पशू चिकित्सालयात डाॅ.सोमवंशी अमर यांच्या हस्ते महात्मा गांधी व डाॅ.आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजा करुन तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

शासनाने ठरवुन दिल्याप्रमाणे हर घर तिरंगा हे अभियान दि.१३ते१५ पर्यंत देशभरात राबवले जाणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर व कार्यालयावर राष्ट्र ध्वज फडकावणे अभिप्रेत आहे.आणि या अभियानाचाच एक भाग म्हणुन या गावातील ग्रा.पं.पोलीस दुरक्षेञ,पशू दवाखाना,शाळा,सोसायटी इत्यादी ठिकाणी ध्वज फडकविण्यात आला.

यावेळी डाॅ.अमर सोमवंशी,पर्यवेक्षक आर.आर.खतीब,परिचर उध्दव माने, तानाजी जोगपेठे सह पञकार पप्पू पाटील व पशूपालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments