तांबाळा येथे शिवपार्वती उत्सव विविध उपक्रमाने साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : श्रावण मासनिमित्त श्रीक्षेत्र तांबाळा येथे सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी शिवपार्वती उत्सवानिमित्त गावातून येथील षणमुकेश्वर मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या निमित्य येथील मंदिरात 101 स्वामी दांपत्याचे पूजन व सुवासिनीच्या हस्ते बसवराज स्वामी शरद स्वामी व संतोष स्वामी यांच्या पौरोही त्याखाली ओटीभरण करण्यात आले या निमित्त येथील समाधी स्थळास जलार्पण बिल्वार्पण रथोत्सव यासह अनेक धार्मिक समारंभ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पर्वणीत महाराष्ट्र कर्नाटकातील अनेक भाविकांनी सहभाग नोंदवला .
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र तांबळा येथे तपोधाम मठ संस्थान तांबाळा व श्री करीब बसवेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती गुरु मुरगेंद्र उर्फ विजयकुमार स्वामी यांच्या अधिपत्त्याखाली कलमडी येथील हिरेमठ संस्थांचे लोकनाथ उर्फ गुरपदप्पा हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपार्वती उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी शिवभक्त परायण सर्वश्री महेश देवरु गुरु विश्वेश्वर विरक्त मठ संस्थान सांगली शिंदनकेरा बिदर येथील राचट्टे मठ संस्थानचे व्हन्नलिंग स्वामी हे उपस्थित होते.याप्रसंगी बसवराज चंद्रकांत मुस्तापुरे, मुसळंब येथील वैजीनाथ माणिकराव पाटील व बडूर येथील शिवम धनशेट्टी हल्लाळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर गुरु मुरगेंद्र उर्फ विजयकुमार स्वामी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत मुळे व कुमारी ऐश्वर्या संतोष पाटील यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले तर गुरु मुरगेंद्र उर्फ विजयकुमार स्वामी यांच्या आशीर्वाचनाने या समारंभाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री बसवराज इंडे,तुकाराम हनमावाले, देवेंद्र आप्पा कोराळे व पसरगे आणि मुळे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.



0 Comments