महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : रविवार दिनांक सहा जुलै रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महात्मा बसवेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी शाळेतील मुला- मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख प
रिधान केले होते. कोणी विठोबा, कोणी रुक्मिणी तर कोणी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेमध्ये विठ्ठल प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग, भक्ती गीते याप्रसंगी सादर केली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखी मिरवणूक गाव परिसरातून नेण्यात आली. त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि ‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली,’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी महात्मा बसवेश्वर स्कूलमध्ये अवतरले होते. ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक दिनकर तरमुडे, उपमुख्याध्यापक मीना तरमुडे,शिवकन्या क्षीरसागर, राजश्री दाळिंबे, वैष्णवी बेद्रे, शुभांगी दाळिंबे, प्रियांका मोहिते, सुवर्णा सुरवसे, कल्पना कांबळे, उध्दव इंगळे
आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.








0 Comments