Advertisement

कोकळगाव येथे मोहरम उत्सव उत्साहात संपन्न

 कोकळगाव येथे मोहरम उत्सव उत्साहात संपन्न 



मुख्य संपादक:द्रोणाचार्य कोळी

9822041174



निलंगा : मुहर्रम वर्षातील चार पवित्र महिन्यांपैकी एक आहे. मोहरमचा दहावी हा आशुरा म्हणून ओळखला जातो, जो इस्लाममध्ये स्मरणाचा एक महत्त्वाचा दिवस आहे . निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे पाच दिवस मोहरम उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी पिर (देव) बसवण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने न्याल्हैद्री, पंजायतन, अली अकबर, हुसेंनपाशा, डोली,असे पिर् बसवण्यात आले होते. पाच दिवस मोहरम उत्सव महोत्सव मध्ये हिंदू मुस्लिम बांधव मिळून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करण्यातआला..दररोज  रात्री धुल्ला, पवित्रा, आदी खेळ खेळण्यात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतानाचे चित्र पाहावयास मिळाले. शनिवार दिनांक 5 जुलै रोजी नववी असल्याने  संपूर्ण गावाचे नैवद्य न्यालहद्री, पंजायतन, अली अकबर, हुसेनपाशा आदी पिरांना दाखवण्यात आले तर याच दिवशी मनोकामना पूर्ण झालेल्यांचा देवांला नवस पूर्ण करण्यात आला.व रविवारी दहावीच्या दिवशी पिराना उठवून सर्व पिरांचे विसर्जन करण्यात आले.यावेळी परिसरातील भाविक भक्त गणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अशा तर्हेने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments