Advertisement

निलंगा येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठी डिजिटल बँकिंग फ्रॉड संबंधी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 निलंगा येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठीची डिजिटल बँकिंग  फ्रॉड संबंधी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



निलंगा : शुक्रवार दि.04 जुलै 2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निलंगा यांच्या वतीने उपविभाग निलंगा अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे निलंगा, देवणी, औराद शहाजनी, कासार सिरसी येथील तपासीक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे साठी "बँक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड" या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यशाळा घेण्यात आली.सदर प्रशिक्षण हे आयसीआयसीआय बँकेच्या फायनान्सीयल क्राईम अँड प्रिव्हेन्शन ग्रुप च्या वतीने पोलीसांना डिजीटल व आर्थिक फसवणुक, त्यातील ट्रेंड्स, त्यावरील प्रतिबंधक उपाय यासारख्या तांत्रीक बाबी माहिती होण्याकरीता  महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील सेमीनार हॉल येथे आयोजीत करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी डॉ.नितीन कटेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयसीआयसीआय बँकेचे पुणे येथील श्री.सुमित महाबळेश्वरकर, श्री.लिलेष भगत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील प्राचार्य डॉ.बी.एस.गायकवाड व उप प्राचार्य श्री.प्रशांत गायकवाड हे होते. सदर प्रशिक्षण वेळी बँक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड संदर्भातील गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रीक व कायदेशीर स्वरुपाच्या आडचणीवर कशा प्रकारे मात करावी याबाबत श्री.सुमित महाबळेश्वरकर यांनी सखोल असे मार्गदर्शसदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी श्री.अभिजीत मंगरुळकर, बॅक व्यवस्थापक, आयसीआयसीआय बँक निलंगा शाखा व त्यांचे सहकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, निलंगा येथील श्री.शेषेराव माने वाचक पोउपनि व पोलीस अंमलदार महादेव भुतमपल्ले, युवराज पेठकर यांनी परिश्रम  घेतले. व सदर प्रशिक्षणा चे आभार प्रदर्शन   श्री. विठ्ठल दुरपडे सपोनि पोलीस स्टेशन औराद शहा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments