Advertisement

छावा संघटनेच्या वतीने सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात कृषी विभागाचा केला निषेध

 छावा संघटनेच्या वतीने सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात 




 कृषी विभागाचा केला निषेध


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : निलंगा तालुक्यात  खरीपाची पेरणी  वेळेवर झाली मात्र महाबीज व अन्य इतर सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाहीत त्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात अडकला आहे. हजारो एकरावरील सोयाबीनची पेरा  उगवलेच नाही मात्र निलंगा कृषी विभाग याकडे साफ दुर्लक्ष करून पंचनामे करत नसल्यामुळे छावा संघटनेच्या वतीने निटूर सह परिसरात सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्याला  बांधावर जाऊन दुबार पेरणीसाठी खत व सोयाबीनचे बियाणे दिले.निटूर येथील काशिनाथ  बाबुराव जाधव यांचे पूर्ण  चार एकर वरील सोयाबीन उगवलेच नाही त्यामुळे खत बियाणे देण्यात आले.व कृषी विभागाचा निषेध नोंदवण्यात आला.

कृषी विभागाचे दुर्लक्ष का?असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेल्या निष्काळजी कृषी अधिकाऱ्याचा निषेध  छावा संघटनेच्या माध्यमातून नोंदवण्यात आला.

यावेळी शेतकरी नेते प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरवडे दीपक, छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दास साळुंखे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज फेसाटे, वाहतूक आघाडी रमाकांत करे, विद्यार्थी आघाडी वैभव गोमसाळे, केशव पाटील, विष्णू करे, बालाजी माळी, अवधूत कदम,आकाश पाटील ,सुमित मनाळे सह शेतकऱ्याच्या बांधावर खत बियाणे आदीचे वाटप करण्यात आले.तसेच याप्रसंगी कृषी विभागाचा निषेध नोंदवण्यात आला.

Post a Comment

0 Comments