Advertisement

डॉक्टर अमन मुलाणी व डॉक्टर अजमल मुलाणी यांनी सेवेतून जनतेचा विश्वास संपादन केला. जीवनज्योती हॉस्पिटल द्वितीय शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले मत !

 डॉक्टर अमन मुलाणी व डॉक्टर अजमल मुलाणी यांनी सेवेतून जनतेचा विश्वास संपादन केला.  

जीवनज्योती हॉस्पिटल द्वितीय शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले मत !


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

942010756


लातूर : लातूर शहरापासून ११ किलोमीटर अंतरावरील मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोरील खंडापूर अंतर्गत असलेल्या महादेव नगर भागात जीवनज्योती हॉस्पिटल च्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 

डॉ. अमन मुलाणी (MD) व डॉ. अजमल मुलाणी (BAMS) यांनी सुरू केलेल्या जीवन ज्योती हॉस्पिटल द्वितीय शाखेचा शुभारंभ फादर्स डे चे औचित्य साधून त्याच दिवशी डॉक्टरांचे पिताश्री सेवानिवृत्त शिक्षक श्री. दिलखुश अब्दुलगफूर मुलाणी सर यांच्या हस्ते तसेच लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, मोइजभाई शेख सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रदीप पाटील खंडापूरकर अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकाधिकारप्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार व हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे हे होते.  

याप्रसंगी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना मुलाणी परिवार हा अत्यंत कष्टाळू, सहनशील, प्रमाणिक आणि सेवाभावीवृत्तीचे असल्याचे सांगत असतानाच आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर बनवले तसेच मुलाणी ताई आणि मुलाणी सर या शिक्षक दांपत्याने शिकवलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत असल्याचेही पनाळे यांनी सांगितले.

कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित मान्यवर दिलखुश अब्दुलगफूर मुलाणी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पनाळे, मोइजभाई शेख, प्रदीप पाटील खंडापूरकर, डॉ. जितेन जयस्वाल बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिक्षक, चाकूर, डॉ. विष्णु तारसे स्त्रीरोग तज्ञ, तारसे हॉस्पिटल लातूर, डॉ. मनोज परब भूलतज्ञ, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, डॉ. विशाल मैंदरकर बालरोगतज्ञ, मैंदरकर हॉस्पिटल लातूर, डॉ. धनराज शितोळे दंतरोग तज्ञ, डॉ. महेश शिंदे मोरया हॉस्पिटल लातूर, डॉ. संदिप राजहंस १०८ रुग्णवाहिका, डॉ. उमाकांत जाधव माऊली ब्लड बँक लातूर, सुरेश मस्के सरपंच खंडापूर, कुमार पाटील माजी सरपंच खंडापूर, पंडित लखणगिरे व्हाईस चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी खंडापूर, हाजी बाबा उर्फ इमाम शेख हरंगुळ (बु.), बापू साळुंखे महादेव नगर, अल्लाबक्ष शेख सर, हसन मुल्ला, जलाल मुल्ला उपसरपंच, अल्लाबक्ष शेख सर, बाबा टेळे या सर्व मान्यवरांचा जीवन ज्योती हॉस्पिटल व मुलाणी परिवार यांच्या वतीने शाल पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

  याप्रसंगी डॉ. जितेन जयस्वाल, मोइजभाई शेख, प्रदीप पाटील खंडापूरकर, अल्लाबक्ष शेख सर यांचे शुभेच्छा पर भाषणे झाली.  

यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी जीवनज्योती हॉस्पिटलच्या द्वितीय शाखेच्या शुभारंभाच्या निमित्ताने डॉ. अमन मुलाणी (MD), डॉ. करिश्मा मुलाणी (MS), डॉ. अजमल मुलाणी (BAMS) यांना गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन डॉ. उमाकांत जाधव यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार खलिल शेख यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमास मुलाणी परिवार त्यांचे अप्तस्वकीयासह महादेव नगर, खंडापूर, चिंचोलीराव, चिंचोलीराव वाडी, शामनगर, हरंगुळ, शिराढोण, धाराशिव, सांगली येथून मित्रपरिवार व  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments