श्री स्वामी समर्थ केंद्रात योग प्राणायाम शिबिर संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा :जागतीक योग दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय योग प्राणायाम शिबिर संपन्न झाले. योग प्राणायाम प्रशिक्षक श्री गुरुनाथ मोहोळकर यांनी प्रशिक्षण दिले. श्री स्वामी समर्थ केंद्र जिजाऊ नगर निलंगा येथे संपन्न झाले. यावेळी महिला पुरुष सेवेकरी मुले मुली उपस्थित होते. डी के पाटील इंग्लिश स्कूल निलंगा येथे सरस्वती देवी प्रतिमा पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुहासिनी पाटील मॅडम यांच्या हस्ते करून शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच पालावरची शाळा इनामवाडी मोड येथे भारतमातेचे पूजन करून योग प्राणायाम शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी तुळशीराम गरगटे सर, नंदिनी लोहार मॅडम व इतर समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments