कोकळगाव आरोग्य उपकेंद्रात योग दिवस साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे योगा करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांमध्ये योग प्राणायाम याची माहिती देणे योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे लोकांना योग केल्यामुळे होणारे फायदे काय असतात याची माहिती दिली व योग आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष देतात त्यांना या योगा दिनानिमित्त योगाचे महत्त्व पटवून दिले गेले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भावी आयुष्य सुदृढ आणि निरोगी होण्यासाठी योग अतिशय आवश्यक आहे याची जाणीव निर्माण करून दिली तसेच सर्वांनी दिवसाची सुरुवात जर योगाने केले तर मानसिक ताणतणाव दूर होतो थकवा येत नाही व मन सतत प्रसन्न राहते मेडिटेशन च्या माध्यमातून सामाजिक मानसिक व शारीरिक स्थैर्यता प्राप्त होते आणि ती निर्माण करण्याचं कार्य योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात येते.
या सर्वांना योगशिक्षण समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रूमणे यांनी दिले. यावेळी आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, श्री.जयपाल रूपनर, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के.जाधव, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील महिला नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments