Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनमान्य शाळेतच पाल्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन; अनधिकृत शाळांची 23-24 जूनला शोध मोहीम

 शासनमान्य शाळेतच पाल्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन;

अनधिकृत शाळांची 23-24 जूनला शोध मोहीम



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


लातूर : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश केवळ शासनमान्य शाळांमध्येच घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. शासनमान्यता नसलेल्या शाळांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि लातूर जिल्हा परिषद यांच्या वतीने 23 आणि 24 जून 2025 रोजी शोध मोहीम राबविली जाणार आहे.

पालकांना शाळेची शासनमान्यता तपासता यावी, यासाठी सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालये आणि जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात मदतकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पालकांनी या केंद्रांमधून मार्गदर्शन घेऊन पाल्यांचा नवीन शाळेत प्रवेश निश्चित करावा. जर चुकून शासनमान्यता नसलेल्या शाळेत प्रवेश झाला असेल, तर त्वरित पाल्याला त्या शाळेतून काढून शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. 24 आणि 25 जून रोजीच्या शोध मोहिमेनंतर अनधिकृत शाळांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

अधिक माहितीसाठी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी (मो. क्र. 9422468573) किंवा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय क्षीरसागर यांच्याशी (मो. क्र. 7796702577) संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments