Advertisement

शॉर्टसर्किटमुळे आग लागून हरंगुळ येथील शेतकऱ्याची बनीम जळून झाली खाक

 शॉर्टसर्किटमुळे आग लागून हरंगुळ येथील शेतकऱ्याची बनीम जळून झाली खाक



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : लातूर पासून जवळच असलेल्या हरंगुळ (बु.) गावातील मधुकर बापूराव वाघमारे यांच्या शेतातील कडब्याची बनीम शॉट सर्किट होऊन जळून खाक झाली आहे. 

दिनांक ९ मे २०२५ वार शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता अचानक पोल वरील तारा एकमेकाला चिटकून शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या कडव्याच्या बनमीवर पडून संपूर्ण जवळपास बाराशे ते पंधराशे कडबा जळून खाक झाला आहे. 

जनावरांचा चाराच संपूर्ण जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावराला कसे सांभाळायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून मदत करावी अशी मागणी हरंगुळचे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments