कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीतीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
कोकळगाव येथील महादेव मंदिराचे नविन बांधकाम करण्यात आले असून शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि गावातील लेक मातांच्या देणगीतून ४१ फूट उंच आकर्षक शिखर बांधकाम करण्यात आले. या शिखरावर पंचधातूचा दिलेला 30 किलो वजन सव्वा तीन फूट उंचीचा कलश पौरोहित महंत वैदिक मंत्रोच्चार आदीच्या जयघोषाने बसविण्यात आला आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी गावातील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळी काढून टाळ, मृदंग, बॅन्ड, ढोल, ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत कलश मिरवणूक काढण्यात आली.
शुक्रवार सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत, व महंत ब्रम्हावृंदाच्या हस्ते वैदिक पूजा मंत्रोच्चार आदींच्या जयघोषाने कलशारोहण करण्यात आले.
यावेळी गावातील लेकमातांना शिवलिंग मूर्ती व साडी चोळी भेट देण्यात आली.कलशारोहण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेल्या महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्यांचा व युवकांचा माजी उप सभापती ज्ञानेश्वर वाकडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
0 Comments