Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शनिवारी लातूर जिल्हा दौरा

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शनिवारी लातूर जिल्हा दौरा



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. आठवले यांचे १९ एप्रिल रोजी सकाळी लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व इतर अधिकारी यांच्यासमवेत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी आढावा बैठक घेतील. दुपारी ३ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून देवणी खुर्दकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५ वाजता देवणी खुर्द येथे बुद्ध विहार उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता चाकूर येथे कै. उत्तम माने यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. रात्री ८ वाजता चाकूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर लातूर येथून दादरकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments