निलंगा येथील "दिव्य प्रकाश भवनच्या" नूतन वास्तूचे सोमवारी उद्घाटन सोहळा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या 'दिव्य प्रकाश भवन' या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ सोहळा २१ एप्रिल रोजी सोमवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.माऊंट आबू येथील आंतरराष्ट्रीय राजयोगा मोटिवेशनल स्पीकर राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषा दीदी यांच्या शुभ हस्ते हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे तर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मठाधिपती संगणबस्व महास्वामीजी, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य लिंबनप्पा रेशमे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, राजयोगिनी ब्रह्माकुमारी सोमप्रभा दिदी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉक्टर सेलचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातांब्रे आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. शहरातील दत्तनगर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सेवा केंद्राच्या नूतन वास्तूच्या या उद्घाटन समारंभानंतर सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या टाऊन हॉल येथे 'खुशहाल जीवन जीने की कला' या विषयावर उषा दीदी यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.उषा दीदी या आंतरराष्ट्रीय राजयोगा मोटिवेशनल स्पीकर असून भारताबरोबरच भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत.भगवद्गीता, रामायण व महाभारताच्या त्या गाढे अभ्यासक आहेत. रामायण व महाभारतातील ऐतिहासिक पात्रावर त्या प्रवचन देतात.निलंगा येथे होणाऱ्या या अध्यात्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारीज परिवार मागील ८-१० दिवसापासून विशेष परिश्रम घेत आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ लातूर जिल्ह्यातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन उदगीर सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा दीदी, निलंगा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नीता दीदी यांच्यासह ओम शांती परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे
0 Comments