Advertisement

कोकळगाव येथील महादेव मंदिर मूर्ती स्थापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

 कोकळगाव येथील महादेव मंदिर मूर्ती स्थापना निमित्त  विविध धार्मिक कार्यक्रम 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



उप संपादिका: अश्विनी बोने 


निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मूर्तीची शोभायात्रा, व रात्री बाबा महाराज काटगावकर यांचे कीर्तन तसेच 14 एप्रिल रोजी सकाळी  होम हवन,  तसेच विविध धार्मिक कार्यक्रम करून शिवलिंग मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. सदर धार्मिक कार्यक्रम दोन दिवस असणार आहे.यानिमित्त महादेव मंदिराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.

  भव्य दिव्य अशी शिवलिंग मुर्ती विधीवत बसवण्यात येणार असल्याचे महादेव मंदिर कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.प्रतिष्ठापना व महापुजेसाठी विविध मान्यवर यांच्या समवेत अनेक सपत्नीक जोड्या बसवल्या जाणार आहेत अनेक वैदिक ब्रह्मांवृंदाच्या हस्ते पुजा करण्यात येणार आहे. यावेळी गावातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments