Hot Posts

6/recent/ticker-posts

हाडोळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा

 हाडोळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



निलंगा : बुधवार दिनांक 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 या कालावधीत निलंगा तालुक्यातील हाडोळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

श्री सद्गुरू परमहंस योगीराज स्वामी बळीनाथ बाबा संजीवन समाधी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी  अखंड हरिनाम सप्ताहाचे हे प्रथम वर्ष असून त्यानुसार दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती भजन, सकाळी ७ ते ११ गाथापारायण, ११ ते १ गाथा भजन, सायं ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते ११ श्रीमद भागवत कथा 

असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित केले आहेत.


बुधवार (ता. २३) परमहंस गोरक्षनाथजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व

 त्यानंतर महाप्रसाद घेऊन या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

परिसरातील सर्व भाविकांनी या  सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन हाडोळी ग्रामस्थांतर्फे केले आहे.



Post a Comment

0 Comments