Hot Posts

6/recent/ticker-posts

नवोदयच्या प्रवेश परीक्षेत टाका शाळेचे यश , पालकांसह शिक्षकाकडून कौतुक

 नवोदयच्या प्रवेश परीक्षेत टाका शाळेचे यश , पालकांसह शिक्षकाकडून कौतुक

 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



औसा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका येथे जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका येथील समृद्धी दादासाहेब शिंदे व अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका येथील सिध्दांत बाळासाहेब भोई,अन्वयी बालाजी काटे, श्रावणी जगन्नाथ लोखंडे या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख डोके मॅडम , केंद्रीय मुख्याध्यापक श्री गरड साहेब, कमलाकर माने, प्रदीप पाटील, हंसराज शिंदे, दादासाहेब शिंदे व अक्षरधारा प्रायमरी इंग्लिश स्कूल टाका येथील मुख्याध्यापक शिंदे सर,गरड सर,सुधाकर लोकरे सर उपस्थित होते.सूत्र संचलन श्री साळुंके सर यांनी केले व आभार बोंगरगे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर घोडके यांच्यासह सर्व शिक्षक बांधव यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments