Hot Posts

6/recent/ticker-posts

कासार शिरसी येथे महेश महाराज माकणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कासार शिरसी येथे महेश महाराज माकणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : कासार सिरसी येथील श्री विठ्ठल मंदिरात रविवार दिनांक 23 मार्च पासून सुरू झालेल्या श्री ग्रंथराज पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक 29 मार्च रोजी ह. भ.प. महेश महाराज माकणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली या निमित्य शहरात ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला 

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील श्री विठ्ठल मंदिर व हनुमान गणेश मंडळाच्या वतीने ह भ प अरुण महाराज मुळजे यांच्या पौरोहित्या खाली सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह नित्य महाप्रसाद रेणुका भजनी मंडळ चेन्नविरेश्वर महिला भजनी मंडळ व ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ कासार शिरसी यांच्या सामुदायिक हरी जागरासह रोज हरिभक्त परायण आशुतोष महाराज ज्ञानदेव गुरुजी महेश मंडले जनार्धन हेबाडे बुद्धिवंत बिराजदार यांचे प्रवचन तर ह भ प विकास महाराज गायकवाड अवधूत पुरी महाराज व वामन महाराज जाधव जगन्नाथ महाराज जाधव यांचे कीर्तन आयोजनात आले होते सात दिवस चाललेल्या या सत्याची सांगता ह भ प महेश महाराज माकणीकर यांच्या कार्याच्या कीर्तनाने करण्यात आली समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री निलेश चिंचनसुरे

अविनाश होळकुंदे उमाकांत चिंचनसुरे अनिल जानकर राजेंद्र तगरखेडे व राम सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments