Hot Posts

6/recent/ticker-posts

मदनसुरी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन

मदनसुरी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




लातूर:  निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील मदनानंद विद्यालय येथे सन 1991-92 या शैक्षणिक वर्षातील दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी केलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये पन्नासहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याप्रसंगी सर्व शिक्षकांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 

सुमारे 33 वर्षांनी पुन्हा वर्ग भरवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यात विविध स्तरावर कार्य करणारे माजी विद्यार्थी यांनी योगदान दिलेले आहे. सदर कार्यक्रमात मनोगत, व्याख्याने, मार्गदर्शन सोबतच कलागुणांचा आविष्कार देखील माजी विद्यार्थी करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पित करून आणि आठवणींना उजाळा देऊन होणार आहे. 1991-92 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments