किल्लारी येथे घरोघरी गुढीपाडवा उत्साहात साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.किल्लारी परिसरात घरोघरी गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला.
निसर्गातील वृक्षांना आजच्या दिवशी पासून नविन पर्णी फुटण्यास सुरुवात होते. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केल्याचे सांगितली जाते. त्यामुळे चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नव वर्ष म्हणून साजरा केला जातो. दरम्यान किल्लारी येथे घरोघरी एरंडीच्या काठीस साडी ब्लाउज हार साखरेचा खोबऱ्याचा हार घालून सहकुटुंब महिलानी नऊवारी साडी नेसून मनोभावे पूजा केली गेली. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वर्षभर काम करण्यासाठी लागणारा शेतगडी याच दिवसापासून शेत काम करण्यासाठी नोकरीला ठेवला जातो. गावातील मंदिरात याच दिवशी पंचांग वाचन केले जाते.एकंदरीत गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
0 Comments