डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर..
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा आणि समतेचा विचार डोळ्यासमोर उभा राहतो. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अन्यायाविरुद्ध संघर्ष केला आणि वंचित, शोषित, पिडितांना त्यांचा न्याय हक्क व अधिकार मिळवून दिला. त्यांचे विचार पुस्तकातच बंदिस्त न राहता समाजातील प्रत्येक घटकात पोहोचला पाहिजे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने दि.२९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली.यात सर्वानुमते अध्यक्षपदी धम्मानंद काळे तर कार्याध्यक्षपदी आयु. रामलिंग पटसाळगे यांची निवड करण्यात आली. या समिती उपाध्यक्षपदी आयु. दिगंबर सूर्यवंशी,आयु. वाल्मीक चव्हाण आयु. देवदत्त सूर्यवंशी, आयु. संदीप बनसोडे,कोषाध्यक्षपदी आयु. संजय सोनकांबळे,सह कोषाध्यक्ष आयु. निलेश गायकवाड सचिवपदी आयु. गोविंद सूर्यवंशी सह सचिव आयु. अमोल सोनकांबळे प्रसिद्धीप्रमुख पदी मिलिंद कांबळे, सोशल मीडिया प्रमुखपदी आयु. दयानंद कांबळे,सल्लागार आयु. प्रकाश गायकवाड संघटक पदी दत्ताभाऊ सूर्यवंशी चिचोंडिकर
कायदेविषयक सल्लागार ॲड.सुशील सोमवंशी इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली. या समितीत आयु.उध्दव मेकाले, राजू कांबळे, दीपक चोपणे, मुजीब सौदागर, दत्ता शिंदे, सुमित गायकवाड, करण कांबळे, आश्विन सूर्यवंशी, आशिष पराग, आशिष सोनकांबळे, समर्थ देशमुख, श्रीनिवास शिंदे , प्रवीण कांबळे, सचिन सुरवसे, बालाजी कांबळे, विजय पाटील, उत्तम माने, विश्वनाथ शिंदे, विरेंद्र काळे,राहुल मोरे,सुधीर पटसाळगे,दत्ता सूर्यवंशी माळेगावकर, अतिश काळे,इत्यादींचा सक्रिय सहभाग आहे.
0 Comments