Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकाधिकार संघ अहिल्यानगर जिल्हाप्रमुख पदी ॲड. नामदेवराव जायभाये तर बीड जिल्हाप्रमुख पदी धोंडीराम वाघ यांची नियुक्ती

 लोकाधिकार संघ अहिल्यानगर जिल्हाप्रमुख पदी ॲड. नामदेवराव जायभाये तर बीड जिल्हाप्रमुख पदी धोंडीराम वाघ यांची नियुक्ती.

 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर :- लोकाधिकार संघाचा दिनांक १२ जानेवारी २०२५ वार रविवार रोजी वर्धापन दिन संपन्न झाला. लोकाधिकार संघाचा विस्तार हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र प्रांतात होत आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात सत्याची बाजू घेऊन सामान्य माणसाला मदत करण्याचे कार्य लोकाधिकार संघाच्या माध्यमातून होत आहे.  

लोकाधिकार संघाच्या कार्याच्या विस्ताराबरोबर संघटनेचाही विस्तार होत असून लोकाधिकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाप्रमुख पदी ॲड. नामदेवराव भुजंगराव जायभाये यांची तर बीड जिल्हाप्रमुख पदी श्री धोंडीराम देविदास वाघ यांची लोकाधिकारप्रमुख श्री व्यंकटराव पनाळे यांनी नियुक्ती केली असल्याचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके यांनी जाहीर केले आहे. 

ॲड. नामदेवराव जायभाये हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अकोला या गावचे रहिवासी आहेत, तर धोंडीराम वाघ हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कृष्णानगर येथील रहिवाशी आहेत.  

ॲड. नामदेवराव जायभाये यांना लोकाधिकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हाप्रमुख पदी आणि धोंडीराम वाघ यांना लोकाधिकार संघाच्या बीड जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करून तसे नियुक्तीचे पत्र लोकाधिकारप्रमुख माननीय श्री व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. या दोघांनाही नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या हातून सामाजिक कार्य व्हावे अशा शुभेच्छा लोकाधिकारप्रमुख यांनी दिल्या आहेत. 

वरील दोघांच्या नियुक्तीचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हणमंतराव शेळके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, लोकाधिकार संघाचे मराठवाडा विभागप्रमुख सुरेंद्रभाई अकनगिरे, प्रदेश पदाधिकारी डॉ. राम गजधने, दयानंद चव्हाण, शिवदास बुलबुले, लातूर जिल्हाप्रमुख वीरनाथ अंबुलगे, सोलापूर जिल्हाप्रमुख सुहासराव शिंदे, धाराशिव जिल्हाप्रमुख नंदकुमार कापसे, लातूर महानगरप्रमुख भारतराव बिराजदार, अकोला जिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीपसिंह बैस, लातूर जिल्हा उपप्रमुख माधवराव तोंडारे, लातूर जिल्हा उपप्रमुख लिंबाजी हजारे, धाराशिव जिल्हा उपप्रमुख महादेव काकडे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments