पोलीस पाटील संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकीचे भालचंद्र शेळके पाटील यांची निवड.
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
शिर्डी : महाराष्ट्र राज्य गावाकमगार पोलीस पाटील संघटनेचे दि. १२ जानेवारी २०२५ वार रविवार रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांचे राज्यस्तरीत शिबीर संपन्न झाले. या शिबिरात लातूर जिल्हाध्यक्ष पदी उदगीर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले डोंगरशेळकी या गावचे आदर्श पोलीस पाटील व मागील दहा वर्षापासून उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष असलेले भालचंद्र सोपानराव शेळके पाटील यांची लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
भालचंद्र शेळके पाटील यांना त्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महसूल विभागाचा उपविभागीय स्तरावरचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे, तर या वर्षी सण २०२४ चा लातूर जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्यासाठी महसूल दिनी प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला आहे,
भालचंद्र शेळके पाटील हे एक आदर्श व्यक्तिमत्व असून ते सतत गोरगरिबांना मदत करत असतात, तसेच ते सर्व सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेऊन पुढे असतात. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments