किल्लारीच्या गृहिणींची सोलापुरात हुरडा पार्टी
स्वतःसाठी काढला वेळ, विविध खेळाचा घेतला आनंद
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : एक क्षण स्वतःसाठी म्हणत किल्लारीच्या महिलांनी शनिवारी ( ता. १०) सोलापूरच्या पिकनिक पॉईंट मध्ये घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद.
महिलांचा मकर संक्रांति सण जवळ आला असल्याने, कुटुंब मुले बाळे अशा रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये महिलांना स्वतःसाठी वेळ देणे शक्य होत नसते. याची जाणीव खंत गृहिणींच्या मनात नेहमीच राहते. शहरी भागात वेगवेगळ्या संस्था, बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्ग हुरडा पार्टीचा आनंद घेत आहेत. असाच अनुभव ग्रामिण भागातील किल्लारी येथील महिलांनी शनिवारी अनुभवला, स्वतःसाठी वेळ काढला व विविध खाद्य पदार्थ, खेळाचा आनंद घेतला.
यावेळी ज्वारीचा मऊ हुरडा, विविध प्रकारची खोबर चटणी, दाळवा, तील, शेंगदाणे, आदी चटणी, गावरान गुळ, कांदे, बटाटे, वांगी, रताळे, आदीच उकड,
दही खिचडा, त्यानंतर वेगवेगळे मैदानी खेळ, झोका, रस्सीखेच खुर्ची रेस, गीत गायन, फुगा फोड, वेगवेगळे नृत्य, रस्सीखेच, कॅमल रायटिंग नंतर सायंकाळी स्वादिष्ट भोजनानंतर हुरडा पार्टीची सांगता झाली.
यावेळी डॉ. निर्मला गुंजोटे, सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, मुख्याध्यापक वैशाली दुधनी, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुंजोटे, अनिता बाबळसुरे, शैला सगर, डॉ. राजेश्री माशाळकर, डॉ. ऐश्वर्या गुंजोटे आदींची उपस्थिती होती.
पूर्ण....
0 Comments