Hot Posts

6/recent/ticker-posts

सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिराचा हासोरी येथे समारोप

 सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिराचा  हासोरी येथे समारोप



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


कासार सिरसी : निलंगा तालुक्यातील हासोरी येथे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थे अंतर्गत सखी अन्न सुरक्षा शेती या विषयावर सहा दिवसीय ऑफलाइन शिबिराची आयोजन करण्यात आले होते यात 25 महिलांनी सहभाग नोंदवला या शिबिराची सांगता शिरूर अनंतपाळ येथील जगदेवी सुगावे यांच्या हस्ते करण्यात आले.

हासोरी येथील स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या सर्वश्री सुपर सखी सुजाता पांचाळ व सखी सौ सविता बरमदे यांच्या वतीने आयोजनात आलेल्या सेंद्रिय शेती आरोग्यासाठी काळाची गरज या शेतकऱ्यातून उत्तम प्रतिसाद लाभला या शिबिरात रासायनिक खते औषधे फवारणी चे दुष्परिणाम व त्यातून होणारे अनेकाचा याची माहिती देण्यात आली. त्याऐवजी सेंद्रिय शेती करणे लाभदायक आहे याचे महत्त्व सांगण्यात आले. यात जीवामृत दश पालणी बीज उगवण प्रक्रिया लिंबोळी अर्क बुरशीनाशक हराळे अर्क हे कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तर गांडूळ खत निर्मिती खताचे बेड कसे तयार करायचे त्याचे काय फायदे काय या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले याप्रसंगी प्रत्येक शेतकऱ्यांना किमान एक हेक्टर तरी सेंद्रिय शेतीची लागवड करावी असे आवाहन करण्यात आले,तर सेंद्रिय शेती आरोग्यास उत्तम असा संदेश देण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments