बांगला देशातील हिंदू वरील हल्ल्यांचा कासार सिरसीत निषेध
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी: बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ कासार सिरसी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले या निमित्य शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला यानिमित्य भारत सरकारला निवेदन देण्यात आले येथील मंडल अधिकारी श्री गिरी यांनी हे निवेदन स्वीकारले.
कासार शिरसी येथील हिंदू बांधवांच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ठीक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या निषेध अभियानास उत्तम प्रतिसाद दिसून आला.
संकटात हिंदू तर मदतीला कोटी बंधू याचा साक्षात्कार ग्रामीण भागात दिसून आला कासार शिरसी येथे आयोजित निषेध मोर्चाला औराद शहाजानी येथील व्यापारी किशोर पोद्दार यांनी संबोधित केले याप्रसंगी येथील व्यापारी सर्वपक्षीय कार्यकर्ते यांचे सह धनराज होळकुंदे ,प्रशांत स्वामी, अनंत पोद्दार ,शाम शालगर, सुरेश नदीवाडी,सोमनाथ मार्कड यांची उपस्थिती होती.मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी कासार शिरसी पोलिसांनी सर्वत्र उत्तम बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments