कासार सिरसी सह ममदापूर व बालकुंदा येथील रोपवाटिकेतील सावळा गोंधळ थांबवा अन्यथा उपोषणाचा इशारा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी : कासार सिरसी सह या भागातील कासार बालकुंदा व ममदापूर येथील रोपवाटिकेत बोगसमजूर दाखवून अनेक महिन्यापासून शासनाची फसवणूक करण्यात येत आहे हा गैरप्रकार त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कासार सिरशी वाडी येथील तरुण कार्यकर्ते रायप्पा नामदेव मंडले यांनी निलंगा येथील तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे
वृक्ष लागवड करा, पर्यावरण वाचवा, ही चळवळ सर्वत्र प्रभावीपणे राबवण्यात येत असता प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रोपवाटिकेतच सावळा गोंधळ होत असल्याने प्रशासकीय पर्यावरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या रोपवाटिकेत कित्येक महिन्यापासून बोगस मजूर दाखवले जातात ज्या मजुरांना मजुरीची गरज आहे अशांना चालवली जात आहे यामुळे मजुरीसाठी भटकंती करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ आली असून हा गैरप्रकार न थांबल्या आपण उपोषण करू असे मंडले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या तरुणांनी घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे
0 Comments