Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार सेनेच्या जिल्हा पदी किशोर जाधव यांची निवड

 सहकार सेनेच्या जिल्हा पदी किशोर जाधव यांची निवड 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


औसा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव सहकार सेना लातूर जिल्हा अध्यक्ष पदी किशोर अरविंद जाधव यांची शिवसेना सह संपर्क प्रमुख नामदेव मामा चाळक शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. आहे.

सहकार क्षेत्रात औसा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ३ वर्ष उपसभापती म्हणून काम केले, त्यांनी औसा तालुका खरेदी विक्री संघ औसा येथे गेल्या ७ वर्षा पासून संचालक म्हणून काम करत आहेत. तसेच तळणी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी गेल्या २ वर्षा पासून कार्यरत आहेत.यू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे युवा नेते आ. आदित्य ठाकरे, माजी

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीत खा. ओमराजे लिंबाळकर यांच्या प्रचाराची जोरदार मोहिम राबविली. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निवडणूकीत निष्ठेने काम केले.

या सर्वांची दखल घेऊन  सहकार सेना जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याने औसा तालुक्यात त्यांच्या निवडीचे सर्वञ स्वागत होत आहे. 

यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments