Advertisement

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सुरेश लामतुरे तर उपाध्यक्ष पदी गोपाळ लामतुरे

 शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सुरेश लामतुरे तर उपाध्यक्ष पदी गोपाळ लामतुरे




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा: निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापण समिती गठण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच गुरलिंग वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली व संपूर्ण पालक वर्गाच्या उपस्थितीत समिती गठीत करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी सुरेश परमेश्वर लामतुरे तर उपाध्यक्ष पदी  गोपाळ लिंबराज लामतुरे यांची तर सदस्य म्हणून सौ. चंद्रकला शैलेश कोळी, मारोती नामदेव सगर,लालामिया अलिमोद्दीन शेख,व सौ. जनाबाई दिलीप शिंदे, व जगदीश संभाजी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे,एम. आय तांबोळी, विरेंद्र चामे, हरिनंद सगर, वंदना कांबळे आदींची उपस्थिती होती. नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments