निराधारांच्या मानधनात वाढ करा
तालुका संघटनेची मागणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : लातूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व निराधारांच्या मानधनात वाढ करावी अशा आशयाची मागणी मराठवाडा प्रदेश निराधार संघटना शाखा निलंगा च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
संबंध राज्यात सध्या निराधारांना जेमतेम मानधन देण्यात येत आहे, सध्याच्या या संघर्षाच्या काळात देण्यात येणारा निधी अपुरा पडत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत याचा विचार करून, तालुका निराधार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गोविंदराव चिंचोळीकर यांच्या वतीने मराठवाडा निराधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी कांबळे लातूरकर व लातूर जिल्हा अध्यक्ष मधुकरराव कांबळे कोराळीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले
याप्रसंगी परमेश्वर कटारे,लता कांबळे, राजश्री कारागीर,युसुफ बडूरे आदींची उपस्थिती होती.
0 Comments