कासार बालकुंदा येथे सोमनाथ सुर्यवंशी यांना आदरांजली
निलंगा : निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील भिम नगर, येथे परभणी प्रकरणातील निष्पाप, गरीब कुंटुबातील, होतकरु, सामाजिक कार्य करणारा , संविधान प्रेमी, आदर्श विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी (रामलिंग मुदगड) यांचा पोलिस कोठडीत मृत्यु झाला.ही घटना अत्यंत दुर्दैवी कृत्यातुन झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायी गावागावातुन निषेध करत आहे .तसेच कासार बालकुंदा येथील अनुयायांनी कालकथित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व परभणी प्रकरणातील घटनेसी संबंधित असणारे कर्मचारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
0 Comments