Hot Posts

6/recent/ticker-posts

घर सुरक्षा साठी 112 नंबर वापरण्याची पोलीस निरीक्षक सुधाकररावजी देडे यांचे आव्हान

 घर सुरक्षा साठी 112 नंबर वापरण्याची पोलीस निरीक्षक सुधाकररावजी देडे यांचे आव्हान

म्हाडा सोसायटीच्या वतीने सुरक्षारक्षकांचे केले स्वागत




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




लातूर: लातूर येथील म्हाडा कॉलनी च्या सुचनाफलकाचे व सुरक्षारक्षकांच्या कक्ष चे उद्घाटन करत असताना पोलीस निरीक्षक यांनी वरील उदगार काढले यावेळी लातूर येथील म्हाडा मध्ये राहणाऱ्या 736 कुटुंबाचे शुशोभीकरनासह भव्य असे इमारती बांधून कुटुंबांना राहण्यासाठी आज रोजी 736 कुटुंबाची भव्य इमारती बांधण्यात आली आहे त्यापैकी आज रोजी 350 कुटुंब वास्तव्यास आहेत, या म्हाडाच्या संरक्षणासाठी सूचनाफलक व सुरक्षा रक्षकांक्षाचे कक्ष केल्याने तेथील दक्षता समितीने असा ठराव घेतला की गाव वस्तीच्या बाहेर असलेल्या म्हाडा वस्तीच्या संरक्षणासाठी वरील सुरक्षा कक्ष चे अनावरण करण्यासाठी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना आमंत्रीत केले होते, यावेळी त्यांच्ये सहकारी  बीट आमलदार पांढरे साहेब हेही उपस्थित होते, यावेळी सूत्रसंचालन करतांना राठोड यांनी आपल्या प्रास्ताविपर भाषणात आमची कॉलनी ना शहरात ना गावात असल्याने शेजारी एमआयडीसी असल्याने वेगवेगळ्या राज्यातील कामगार कामासाठी येऊन मध्येधुंद अवस्थेत फिरत असल्याने व शेजारी रेल्वे स्टेशन असल्याने आम्हा मुला, बाळांना रात्री बे रात्री फीरण्यासाठी अडचणी येत आहेत नको ते कृत टाळण्यासाठी यांनी संबंधित पोलीस निरीक्षक समोर आपली व्यथा मांडली याला उत्तर देताना आपल्या भाषणात पोलीस निरीक्षक यांनी म्हाडा परिसरातील जनतेला असे आव्हान केले की आम्ही तर आपल्या सेवेसाठी आहोत मात्र आपल्याला वेळप्रसंगी 112 नंबर डायल करून पाच ते दहा मिनिटात आपणाला संरक्षणाची हमी मी देतो अशे आव्हान केले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हाडाचे इंजिनिअर अमित माने हे होते व प्रस्ताविक भाषण अरविंद कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन सतीश पांचाळ सर यांनी मानले यावेळी म्हाडा परिसरातील बहुतांश महिलाही उपस्थित होत्या,त्यांनी पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षकाकडून म्हाडातील सुरक्षा रक्षकांची पोलीस निरीक्षकांकडून स्वागत करण्यात आले, ह्या प्रोग्राम यशस्वीतेसाठी म्हाडातील दक्षता समितीचे सर्वच पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments