Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथील काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंग मंदिरात शिवलिंगाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा

 कोकळगाव येथील काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंग मंदिरात शिवलिंगाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा: काशी विश्वनाथ बारा ज्योतिर्लिंग यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे करण्यात आले आहे. मंदिरात १६ डिसेंबर रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे   मागील कांहीं महिन्यांपासून भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. १६ डिसेंबर २०२४ रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता शिवलिंगाची  नवीन मूर्तीची भव्य मिरवणूक काढून,प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर जीर्णोद्धार  शहाबाई बाबू वाडीकर रा.मुरूम  यांची उपस्थिती होती.सोमवारी सकाळी ९ वाजता  शिवलिंगाच्या  मूर्तींची पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातारवणामध्ये दुग्धाभिषेक होमहवन व मंत्रोपचाराने, संत श्री संगण बसवेश्वर महाराज निलंगा यांच्या जयघोषाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी सकाळपासूनच कोकळगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक मंदिर परिसरात एकत्र जमले होते. तर रविवारी रात्री नऊ वाजता  शि. भ.प.  संगिताताई पाटील बेंद्रिकर जि.नांदेड यांच्या  कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तर दुपारी दोन वाजता श्री संगन बसवेश्वर महाराज यांचे प्रवचन झाले.व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments