निवडणूक विषयक गैरप्रकार आढळून आल्यास निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे माहिती देण्याचे आवाहन
सी-व्हीजील ॲपवर नोंदविता येणार तक्रार
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रचाराची कालावधी अंतिम टप्प्यात आहे. या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मद्यवाटप, पैशांचे वाटप, मोफत भेटवस्तूंचे वाटप यासारख्या गैरप्रकारांचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती 9270154584 या संपर्क क्रमांकावर अथवा सी-व्हीजील ॲपद्वारे नोंदवावी, असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २३४- लातूर ग्रामीण, २३५- लातूर शहर आणि २३६- अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने काकराला प्रसांत कुमार यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्च विषयक बाबींवर संनियंत्रण करण्यासाठी नियुक्त पथकांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविणे, मोफत वस्तू, मद्य, रोकड याचे वाटप होवू नये, यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे असा कोणताही प्रकार आल्यास मतदारांनी याबाबतची माहिती निवडणूक खर्च निरीक्षक यांना दूरध्वनीद्वारे द्यावी अथवा सी-व्हीजील ॲपवर याबाबतची तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
0 Comments