Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील आशीर्वाद यात्रेचे बसपूर येथे जंगी स्वागत

 माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील आशीर्वाद यात्रेचे बसपूर येथे जंगी स्वागत 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा: माजी मंत्री आमदार संभाजीरावजन संवाद यात्रा बसपुर येथे असता,पाटील यांची गावातील मान्यवरांनी जाहीर सत्कार करून स्वागत केले. गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शंभू महादेवाच्या साक्षीने या सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करून निलंगा मतदारसंघाच्या विकासात्मक वाटचालीवर भाष्य करत आगामी पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मांडले.निलंगा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आज विकास पोहोचला आहे. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असून त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवनमान बदलले आहे. या सर्वाला कारणीभूत हे केवळ आणि केवळ आपले आशीर्वादच आहेत. आपण दिलेल्या लोकप्रतिनिधीत्वाच्या जबाबदारीतून या सर्व गोष्टी आज घडल्या असून संपूर्ण राज्यांमध्ये मतदारसंघाचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे. विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाची गरज असून येत्या २० तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपला लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी विनंती सर्वांना केली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि.प. सभापती संजयजी दोरवे, तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, बिदर जि.प.चे माजी सदस्य सुधीरजी काडादी, औराद शहा. बाजार समितीचे सभापती नरसिंगजी बिराजदार, निलंगा बाजार समितीचे संचालक गुंडेरावजी जाधव, औराद शहा. बाजार समितीचे संचालक कालिदासजी रेड्डी,  विधानसभा निरिक्षक दगडूजी सोळुंके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीरजी पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरीदासजी साळुंके, तालुकाप्रमुख भगवानजी जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी रोहितजी पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रियाजजी सय्यद, रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशजी ढेरे, औराद बाजार समितीचे संचालक रामभाऊजी काळगे,  सुधाकरजी बिरादार,  अण्णारावजी बिरादार,  सखारामजी काळे, दत्तूजी आजने, संजयजी कुमठे, धर्मराजजी बिरादार, संदिपानजी पाटील,  सिद्धेश्वरजी बिरादार, माधवजी बिरादार,  किसनरावजी नरवटे, दत्ताजी नरवटे, पांडुरंगजी नरवाटे, अभिलाषजी नरवटे, बालाजी बावच जी, व्यंकटजी नरवटे, नरहरीची नरवटे, तुकारामजी नरवटे, संभाजीरावजी कांबळे,  तानाजीरावजी कांबळे, रामचंद्रजी कांबळे,  बंकटजी कांबळे, परमेश्वरजी सुरवसे,  अरुणाताई बिरादार, भारताबाई तेलंगे, राधाताई बिरादार यांच्यासह जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष-सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments