औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांचा विजय, ठाकरे गटाचे दिनकर माने पराभूत
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
औसा: लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत. औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने निवडणूक लढवत होते. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होतं. अखेर या मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी एकूण 34564 मतांनी विजय मिळवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने हे 82128 मतांनी पराभूत झाले आहेत.20 नोव्हेंबरला मतदान झाले त्यानंतर औसा विधानसभा कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
0 Comments