Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयकुमार लड्डा यांचा लायन्स क्लब केअर फाउंडेशनच्या वतीने सत्कार

 विजयकुमार लड्डा यांचा  लायन्स क्लब केअर फाउंडेशनच्या वतीने सत्कार 





मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




सांगली: सांगली येथे दोन दशकापूर्वी सेवाभावी वृत्तीने  धर्मादाय रुग्णालय सुरु झाले. पाहता पाहता एक लाखाहून अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया व नेत्रोपचार  करण्यात आले .

आज रोजी दृष्टीआड असलेली सृष्टी ' दाखविण्याच्या या पवित्र कार्यासाठी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स नेत्र रुग्णालय सांगली क्लब केअर संस्थेस रु . ५,००,००० / - ( रु . पाच लाख मात्र ) ची देणगी विजयकुमार लडडा यांनी  दिली आहे. त्यामुळे त्यांचा लायन्स क्लब केअर फाउंडेशनच्या वतीन त्यांचा सत्कार करण्यात आला.यामुळे सांगली सह त्यांच्या जन्मगाव असलेल्या निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे. यावेळी 

लायन्स नेत्र रुग्णालय , सांगली येथील मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments