श्री कल्लेश्वर श्रावण मास यात्रा महोत्सवानिमीत्त महाप्रसादाचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
९८२२०४११७४
निलंगा : ओम नम: शिवाय, हर हर महादेव, अशा नाम गजरात निलंगा तालुक्यातील मुदगड एकोजी येथें श्री कल्लेश्र्वर श्रावण मास यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर येथील ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिराच्या यात्रेस प्रारंभ होतो. शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट ग्रामदैवत कल्लेश्वर श्रावण मास यात्रा महोत्सव असल्याने भाविकांत आनंद, उत्साह दिसून येत होता. यात्रेनिमित्ताने गावाबरोबरच परिसरातील भाविकांनी शुक्रवारी सकाळपासून दर्शनासाठी रीघ लावली होती. भाविकांनी मनोभावे पूजा करुन दर्शन घेत होते. यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन भजन गायन आदींचा लाभ भाविक भक्तांना घेण्यात आला.शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ग्रामदैवत श्री कल्लेश्वर श्रावण मास यात्रा महोत्सवाची सांगता असल्याने, प्रशांत शिवाजी मुळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments