.कांतिका मोरे बालसंकैस्कार शाळेत गोकुळाष्टमी उत्साहात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
९८२२०४११७४
निलंगा: निलंगा तालुक्यातील सांगवी जेवरी येथील कै.कांतिका मोरे बालसंस्कार केंद्र शाळेत सातत्याने विधायक विद्यार्थ्याना प्रेरणा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जातात, शाळेचे मुख्याध्यापक नेताजी मोरे आणि शिक्षवृंद नेहमीच विद्यार्थ्याना शिस्तप्रिय वागणुक, संस्काराचे धडे तसेच सण उत्सवाच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची आठवण करून देत दहीहंडी व गोपाळकाला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः
भगवान श्रीकृष्णच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. शाळेतील शिक्षिकाने गोपाळकाला या उत्सवाबद्दल माहिती सांगितली.यावेळी बालगोपाळांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. अनेक विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशभुषेतही आले होते. यावेळी बालगोपाळांनी कृष्णाच्या गाण्यावर ताल धरलेले दिसून आले.
0 Comments