जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!सुवासिनीने केली वट वृक्षाची मनोभावे पूज
मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: जन्मोजन्मी हाच पती मिळू दे! अशी प्रार्थना करत सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली.
वट वृक्षाची पूजा करीत, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. सत्यवान आणि सावित्री या दांपत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वट पौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते आहे. हिंदू धर्मातील सण प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मो जन्मी हाच पती मिळावा यासाठी वट पौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून, आणि बुंध्याला सुताचे सात फेरे घालतात.
पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आला
मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत शुक्रवार (दि.21) रोजी वटपौर्णिमा साजरी केली.‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करून त्यांनी जुन्या नव्याचा मेळ साधला. काही शहरी भागात पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आले.वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिवसभर दुपारपर्यंत सुवासिनींची पूजेचे साहित्य, वडाची रोपे, फांद्या, फळे, काळी पोत,कापसाच्या वाती, वस्त्रे, सूतगुंडी, करंडाफणी, बांगड्या, वस्त्र, फुले आदीं
वस्तूंची जमवाजमव करून महिलांनी वडपूजा करीत, उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली. वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला आणि कुटुंबाचे आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. महिलांनी वट वृक्षाच्या झाडास सात प्रदक्षिणा घालून वट वृक्षाची मनोभावे पूजा केली.
0 Comments