Hot Posts

6/recent/ticker-posts

संतोष सोमवंशी यांची औसा विधान सभेसाठी मोर्चाबांधणी

 संतोष सोमवंशी यांची औसा विधान सभेसाठी मोर्चाबांधणी 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174


औसा: अवघ्या चार महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले भरघोष मतदान विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बळावर औसाची जागा पदरात पाडून शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख संतोष सोमवंशी कडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मतदार संघातील दांडगा जनसपंर्क पाठीशी घेत संतोष सोमवंशी यांनी बुधवार दि 19 रोजी मुबंई येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा भेटी घेत औशाची निवडणूक लढवण्याची तयारी बोलून दाखवली आहे.

सहकार, संस्था क्षेत्रात काम केलेल्या संतोष सोमवंशी यांनी सरपंच, ते बाजार समितीचे उपसभापती तसेच तालुका खरेदी विक्री सघांचे दहा वर्षांपासून ते सभापती आहेत. पक्ष संघटनेत ही त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हात पक्ष बांधणी केली आहे. तालुक्यात ही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय काम पाहता पक्षाची बाजू मजबूत मानली जाते आहे.विशेष म्हणजे मागच्या काही वर्षात त्यांनी सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे यासाठी आंदोलन केले. तसेच तुर हरभरा हमी भावापेक्षा कमी भावाने असल्याने फरकाची रक्कम द्यावी अशी महाराष्ट्र मागणी संतोष सोमवंशी यांनी केली. व औसा तालुक्यात सर्वाधिक रक्कम मिळवून दिली तुर हरभरा हमी भावापेक्षा कमी भावाने असल्याने फरकाची रक्कम द्यावी अशी महाराष्ट्र मागणी  संतोष सोमवंशी यांनी केली व औसा तालुक्यात सर्वाधिक रक्कम मिळाली हे त्यांचा आंदोलनाचा परिणाम होता.  ग्रामिण भागातील गावोगावी शेतकरी व सर्वसामान्याशी जोडलेली नाळ व सतत आपल्या प्रयत्नशील वृतीतुन बळीराज्यांच्या 

 कांदा टॉमेटो,सोयाबीन ,सह शेतकरी मालाच्या बाबतीत शासनाकडे सतत पाठपुरावा औसा बाजार समिती नावारूपाला आणण्यासाठी महत्वाची भुमिका घेतली .जे पद मिळाले त्या पदाला न्याय देण्यासाठी कर्त्यव्य पार पाडले.सामान्य कुटुंबातील व्यक्ती सरपंच ते महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ उपसभापती खासदार ओमराजे दादा निंबाळकर यांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे सतत लोकांचे कामे करत   ओमराजे  निंबाळकर यांची औसा विधानसभा मतदारसंघात सावली सारखे राहणारे एकंदरीत सतत शेतकर्‍यांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांचा संघर्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदाचा ठरणार आहे.एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाठबळ व पक्षातील अन्य नेत्यांचे विशेष आशीर्वाद सोमवंशी यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी बळ मिळत आहे.याचाच भाग म्हणून संतोष सोमवंशी यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी बुधवारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव खासदार अनिल भाऊ देसाई, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मराठवाडा संपर्क नेते विश्वनाथ नेरुरकर, लातूर जिल्हा संपर्क नेते आमदार सुनील प्रभू, उपनेते प्रा नितीन बानगुडे पाटील, उपनेत्या प्रा सुषमा ताई अंधारे, सिद्धी विनायक ट्रस्ट कोषाध्यक्ष संजय सावंत यांच्या भेटी घेतल्या आहेत. उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची वाट कांही कालावधीसाठी औसेकराना पहावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments