ग्रामीण परीसरात मृगाची दमदार हजेरी,कासार सिरसी बसस्थानकात शिरले पावसाचे पाणी
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी: जवळपास सात कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले कासार सिरसी चे बसस्थानक सर्व सोयीनिशी सुसज्ज आहे अशा या बसस्थानकात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात स्थानकासमोरच्या
मुख्य रस्त्यावर दुतर्फा गटार नसल्याने पावसाचे पाणी चक्क बसस्थानकात घुसल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. मृगाच्या दमदार पावसाच्या आगमनाने पावसाळ्यापूर्वी नाली उपसा न केल्यामुळे ग्रामीण भागात अनेकांच्या घरात पाणी घुसले तर
कासार सिरसीसह कोराळी, तांबाळा, मदनसुरी, कोकळगाव, किल्लारी या परिसरात सोमवार सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री पर्यन्त दमदार मृग बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरीपाच्या पेरणीस पुरेसा पाऊस झाला असल्याने शेतकरी आता पेरणीच्या तयारीत आहेत.
0 Comments