लातूर येथे आत्मसंरक्षण व चारित्र्य निर्माण शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: लातूरमध्ये मागील 15 एप्रिल ते 10 जून पासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर मैदान लातूर येथे सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये निशुल्क आत्मसंरक्षण व चारित्र्य निर्माण शिबिर यशस्वीरित्या निरंतर सलग 55 दिवस घेण्यात आले.ज्यामध्ये विद्यार्थ्यांना
कराटे सर्वांग सुंदर व्यायाम,भूमी नमस्कार, सूर्यनमस्कार लाठी काठी,
भाला, दांडपट्टा,जिम्नॅस्टिक
नॉनचाकू,योगा,प्राणायाम आणि चरित्रनिर्माण या सर्व गोष्टी निशुल्क शिकवण्यात आल्या. त्यासोबतच त्यांना रोज विविध पोषक आहार जसे कडधान्य ,फळे ,काढा ज्यूस, नाष्टा ही निशुल्क वाटप करण्यात आले.
दिनांक 9 जून रोजी शिबिराच्या समारोपानिमित्त सिद्धेश्वर व्यायाम संघातर्फे भव्य पथसंचलन लातूर शहरातील महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथून शिबिराचे ठिकाण श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर लातूर येथे पर्यंत करण्यात आले,
त्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना स्वयंसेवकांना अतिथींना अशा 700 भाविकांना मंदिरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली. नंतर 10 जून सोमवार सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिवकालीन युद्ध कला खेळांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल व बक्षीस वितरन व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आणि शिबिराचा समारोप उत्साहात करण्यात आले .
याप्रसंगी सिद्धेश्वर व्यायाम संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरजजी व्यवहारे यांनी सर्व लातूरकरांस या निशुल्क प्रशिक्षणात रोज सकाळी सहभागी होण्यासाठी आणि असे प्रशिक्षण लातूर मधील प्रत्येक शाळां महाविद्यालयांमध्ये होईल असे आवाहन केले. यावेळी लाठीकाठी प्रशिक्षक व कराटे ईश्वरजी भिसे, रोशनजी गायकवाड नियोजक श्री संभाजी कांबळे, पोषक आहार समिती दत्तात्रयजी चोथवे, मार्गदर्शक वेंकटेश हालिंगे, श्रीकांत रांजणकर, पानगावे ,सोशल मीडिया विशाल शिंदे, प्रकाश बारबोले, गजाकोश , प्रशांतजी भावे, नोंचकू प्रशिक्षक रमेशजी पवार, ऑडिओ व्हिडिओ सिस्टम अजय कदम, राजेश सावळकर, प्रशांतजी ठाकूर, गणेश येरटे, पारस ढगे, गजू शिंदे ,राजू शिंदे, लाईव्ह लखनजी नरके, गणेश भावे, महिला स्वयंसेवक वनिता सूर्यवंशी, महादेवी हिंगणे , बबीता सोळंके, मनीषा गजाकोश आदींची उपस्थिती होती.
0 Comments