Hot Posts

6/recent/ticker-posts

विजयकुमार लड्डा यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

विजयकुमार लड्डा यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 




मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा: निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथिल सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक विजयकुमार किसनलाल लडडा यांच्या वतीने जन्मभूमी असलेल्या गावातील द्रोणाचार्य क्लासेसच्या विद्यार्थ्याना शालेय  पुस्तक संच व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य  विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.

यावेळी  क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी , विदयार्थी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 यावर्षी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांद्वारे सर्वतोपरी मदत करण्याचे ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय सहित्याबरोबरच अनेकविध उपक्रम राबविले जातात.

विजयकुमार लडडा यांनी मागील काळात गावांसाठी अनेक सामाजिक समाज उपयोगी कार्य केलेले आहेत. गावात पाणी टंचाईच्या काळात स्वखर्चाने बोर पाडून दिलेली आहे.तर कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अमृत बिंदू या औषधांचे आणि मास्कचे वाटप केले आहेत. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी गरजूंना उबदार बेडशीटचे वाटप केले.तर दरवर्षी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. अशा समाज उपयोगी कार्य केलेले विजयकुमार लडडा यांच्या बद्दल विद्यार्थ्याच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 



Post a Comment

0 Comments